मी पूजा...खर तर मी काही कवियित्री वगैरे नाहीये बर का! पण मला स्वतःशी बोलायला खूप आवडते.. स्वतःशी संवाद करणे हा माझा जुना आणि आवडीचा छंद.. त्यामुळे मनात खूप काही असलं तरी व्यक्त होता येत नाही... त्यामुळे जे वाटतं, जे काही मनात सलतं ते सरळ कागदावर उतरवते.. त्यातूनच माझा आनंद, राग, भीती सगळं सगळं व्यक्त होत.. त्यामुळे शब्दांशी मैत्री केलीय आता हेच कायम माझ्या सोबत असतील अशी आशा आहे..